कुंभोज येथील छत्रपती शिवाजीनगर,राजर्षी शाहूनगर,इंदिरानगर,जयप्रकाश नगर,स्वराज्य नगर तसेच पाण्याची टाकी परिसर आणि गावातील इतर भागातील प्रॉपर्टी कार्डधारक, शासकीय सनदधारक तसेच गायरान क्षेत्रात अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मालकी हक्कासाठी आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अजित देवमोरे आणि सध्याचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांनी केले.