आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान चेतन नगर परिसरातील दारूबंदी कार्यालय येथे कला मंदिर परिसरातील महिलांनी व नागरिकांनी दारूबंदी अधिकारी यांना संजय वाईन मार्ट बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. संजय वाईन मार्ट मुळे तेथील महिलांना दारू पिणाऱ्या लोकांकडून त्रास होत असल्यामुळे संजय वाईन मार्ट बंद करा सामाजिक कलामंदिर येथील रहिवासी राहुल भुसेवाड व कला मंदिर येथील महिलांनी दारूबंदी अधिकाऱ्याकडे संजय वाईन मार्ट बंद करण्याची केली मागणी