घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी विजय मोतीलाल शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने 25 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदरील कारवाई ही अंबड रोडवरील अशोका हॉटेल परिसरातील लक्ष्मी अँड राखी चाट भंडार समोर गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली. लाचखोर विजय मोतीलाल शिंदे हा घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी असून तो सध्या जालना येथील पांगारकर येथे राहतो.