आज मराठा आरक्षण लढ्याचे धडाडीचे नेते मनोज जरांगे पाटलांची अंतरवली सराटी येथे बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली. या भेटीत संवाद साधताना मराठा समाज बांधवांच्या सोबत मी देखील या आरक्षण आंदोलनात खंबीरपणे उभा असल्याची भावना व्यक्त केली. हे माझ्यासाठी आनंददायी आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी माझी वचनबद्धता कायम राहील असे बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलताना व्यक्त केले.