नवी मुंबईच्या एपीएमसी परिसरामध्ये छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एपीएमसी परिसरात असलेल्या एका रेसिडेन्सी लॉजवर पोलिसांनी छापा टाकल्याने वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या नऊ पीडित महिलांची सुटका केली व त्या ठिकाणी असलेल्या सहा जणांना अटक केली. बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर ही छापा कारवाई करण्यात आली.