रामटेक जवळील शिरपूर येथील शेत शिवारात रविवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान वीज पडल्याने एका दुधाळ गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत पशुपालक थोडक्यात बचावला. शिरपूर येथील पशुपालक गोमा नत्थू निकुरे यांची मालकीची ही गाय होती. ते परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण गोल्हार यांच्या शेतात जवळ पशु चारत होते.