देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस असून कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने 75 हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरू राहणार असून 1 ऑक्टोबरला राज्यातील 419 आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार असल्याचे आज दि.8 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता जिल्हा प्रशासनाने कळविले