शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोमवार खेडा परिसरातील मेघा नदीवर असलेल्या बंधाऱ्यात, पाण्यात बुडून श्रावण उर्फ गोरख सुवारे वय सतरा वर्ष राहणार मल्हारा असे या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. तो मल्हारा येथे रहिवाशी असून शिरसगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे महालक्ष्मीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला होता. घटनेच्या दिवशी बंधाऱ्यावर आंघोळीला गेला असताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.