धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ताफ्यात तीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये दंगल नियंत्रणासाठी दोन अद्ययावत २२-आसनी बसेस आणि गुन्हे तपासासाठी एक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश आहे. या व्हॅनमुळे घटनास्थळीच फॉरेन्सिक चाचण्या करणे शक्य होणार आहे. धुळे पोलीस मुख्यालयात अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे कायदा-सुव्यवस्था व गुन्हे तपासाला गती मिळणार आहे.