उद्या गणरायाच्या आगमन होणार आहे.त्यामुळे मुंबई,ठाणे परिसरामध्ये राहणारे कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जात आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून कोकणवासीय आपल्या गावाकडे जात आहेत मात्र आज सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान दिवा रेल्वे स्टेशन येथे कोकणवासी यांनी प्रचंड गर्दी केली होती. दिवा चिपळून ट्रेन पकडण्यासाठी कोकणवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती.अक्षरशा एकमेकांना धक्काबुक्की करत ट्रेनमध्ये चढत असलेले पाहायला मिळाले असून हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतआहे.