नानलपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवार १० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास परभणी शहरातील जुना पेडगाव रोडवरील नवजीवन कॉलनी येथे एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला, नागपूर आणि लातूर येथील दोन महिलांची सुटका केली.या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर खजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी 2 30 वाजता नानलपेठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.