प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद, होमगार्ड महिला खुन प्रकरण उघडकीस आले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरावरून निर्माण झालेल्या वादातून एका होमगार्ड महिलेचा खून करण्यात आला असून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याची माहिती गुरुवारी सकाळी समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता.