चिंचोली रुद्रायणी गावाजवळील गडावर रुद्रायणी माता विराजमान आहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रुद्रायणी गडावर नवरात्रात मोठी यात्रा असते.नवरात्री काळात रुद्रायनी गडावर मोठी यात्रा भरते अकोला जिल्ह्यासह राज्यातून भाविक रुद्रायनी देवीच्या दर्शनाला येत असतात. देशभरात आदिशक्तीची 108 पिठं असल्याच मानण्यात येतं, यातील रुद्रायणीचं हे मंदिर म्हणजे 14 शक्तीपीठ मानण्यात येत.देवीच्या गडाच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण असल्याने येथे भक्तिमय वातावरण आहे.