तालुक्यात मोसंबी बागायतदारांची फळगड प्रचंड प्रमाणात झाल्याने संकटात आले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. तालुक्यातील सारोळा बुद्रुक शिवारात सचिन सोमवंशी यांची स्वतः ची मोसंबी बाग आहे. या बागेतील अचानक वातावरण बदलाचा फटका बसुन शेतकर्यांच्या तोडांत येणार घास खाली पडल्याचे दिसून आले आहे.