म्हसवड पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर टँकरसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता माहिती देण्यात आली.