अकोला शहरात तौहिद समीर बैद (२४) या आरोपीने चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीचे नातेवाईक गणेश विसर्जनासाठी गेले असताना हा अमानुष प्रकार घडला. आरोपी फरार असून, हा प्रकार डाबकी रोड पोलिस ठाण्यात नोंदविला गेला. शिवसेना शहरप्रमुख रमेश गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोरतम शिक्षा देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केली. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितेला त्वरित न्याय मिळावा, शहरात पोल