सकाळच्या सुमारास पाम बीच रोडवरील अक्षर सिग्नल येथे एका ठार गाडीचा डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता तेथे कोणीही नसल्यामुळे गाडीच्या नंबर वरून मालकाचा शोध घेतला. मालकाशी संपर्क साधला असता आपल्या मित्राला गाडी चालवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले मात्र मित्राशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मित्राने गाडी डिव्हायडरला ठोकली आणि पसार झाला होता. या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.