पोलीस म्हटले की आपल्यासमोर खाकी वर्दीतील एक माणूस दिसून येतो... आपल्या सर्वाचे रक्षण संरक्षण करणे यासाठी सदैव कार्यरत असणारा माणूस.. कुठलाही सन असो की कार्यक्रम असो नेहमी सज्ज असणारा व्यक्ती.. आज पहिल्यांदाच खाकी मध्ये न दिसता कुर्ता पायजमामध्ये पोलीस बांधव व भगिनी दिसल्या निमित्त होते पोलीस स्टेशन येथील स्थापना केलेल्या श्री चे विसर्जन, आज दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 3 च्या वेळेत उमरी शहरातील मुख्य रस्त्याने वाजत गाजत मिरवणूक काढत श्री चे विसर्जन केले आहेत.