आज दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास वाजेगाव ते वांगी जाणाऱ्या रोडवर वाजेगाव बायपास येथे वांगी येथून एक टिप्पर अडवून चौकशी केली असता गोदावरी नदी पात्रातून रेती चोरी करून वाहतूक करीत असताना आरोपी चालक संभाजी टापरे हा मिळून आला होता, ग्रामीण पोलिसांनी 15 लाख किमतीचा टिप्पर क्र. MH-04-EL-3267 हे 15 हजार किंमतीची 3 ब्रास रेतीसह जप्त केले असून सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती आजरोजी दुपारी 2:30 च्या सुमारास देण्यात आली आहे.