लातूर : सध्या लातूर शहर महानगरपालिकेकडून स्वच्छते संदर्भात जनजागरण मोहीम राबवली जात आहे तसेच प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले जात आहेत शहरात प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम व प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण हे टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन प्लास्टिक मुक्ती अभियानात व स्वच्छता राखण्यासाठी तसेच शहरात वृक्ष लागवड होण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. असे मत लातूर येथील सौ. जयश्री नामदेवराव साठे यांनी व्यक्त केले आहे.