दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 च्या सुमारास कुपटी फाटा येथे आरोपी सुनील सुभाष चौधरी वय 38 वर्ष याने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या विविध कंपनीचा 37485 रु. चा गुटखा मोटर सायकल क्र. MH-26-BF-8654 वर वाहतूक करीत असताना माहूर पोलिसांना मिळून आला असता माहूर पोलिसात फिर्यादी ज्ञानोबा खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहूर पोलिसात अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनि घोडके हे करत आहेत.