परभणी शहरातील विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज शनिवार 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. टाळ, मृदंग, ढोल ताशांच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते.