महागाव तालुक्यातील माळकिन्ही गावात आज दि. २६ ऑगस्ट दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास सख्ख्या भावाकडून मोठया भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून दोघा भावात किरकोळ वाद झाला होता. यातूनच मनोरुग्ण असलेल्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जीव घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप अशोक रिंगे वय ३३ वर्ष रा. माळकिन्ही हा मनोरुग्ण आहे. दोघात शेतात मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून वाद झाला होता.