व्यंकटेश नगर येथे एका ३१ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाविरुद्ध ११ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेदरम्यान गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सौ. रत्नाबाई शिवदास डिवरे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,संदीप सुपडा बेलोकार,प्रदिप सुपडा बेलोकार, सौ गंगा संदीप बेलोकार,सौ. जया प्रदिप बेलोकार हे नेहमी वाद घालून मारहाण व शिवीगाळ करत असून त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलगी सौ दिपाली हिने आत्महत्या केली.