भागवत सप्ताह निमीत्त बोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. हा भागवत सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. गुरूवार दिनांक १सप्टेंबर पासून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. ७ सप्टेंबरला सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून दिंडी काढण्यात आली. बापूजी देवस्थान, बोरी तलाव, ग्रामपंचायत कार्यालय, शिंगणवट, बोरी हनुमान मंदिर सभामंडप, अंगणवाडी मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोथी पूजन झाल्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली.