सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देत उदात्त भूमिका घेत व्यापक विचारांची पाठराखण करणे, हीच शंकरराव जगताप यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले. सातारा येथील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात विधानसभेचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप यांना तेराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.