बुधवारी दुपारी सदर बझार पोलीस ठाण्यात आणलेल्या परराज्यातील मालवाहू टेंपोत 01 हजाराहून अधिक प्लाझ्मा बॅग असल्याचे आढळून आल्यानं खळबळ उडालीय. त्यामुळे शहरातील रक्त आणि प्लाझ्माच्या तस्करीला पुष्टी मिळालीय. हा प्लाझ्मा शेजारच्या गुजरातेतील अहमदाबादच्या इंटास फार्मा कंपनीकडं जात होता,अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीनंतर जे सत्य पुढं येईल, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.