गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राज्यभर राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून गावांचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याच्या या उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा नगर भवन, वरोरा येथे आज दि १० सप्टेंबर ला ३ वा. पार पडली.या कार्यशाळेत खा. प्रतिभा धानोरकर, आ. करण देवतळे, . गजानन मुंडकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व मान्यवर उपस्थित होत.