सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 18 लाख रुपये खर्च करूनही मुलाला नोकरी न मिळाल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने मानसिक तणावात गेलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.ही हृदयद्रावक घटना काखे येथे शुक्रवारी दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.संभाजी विष्णू पाटील (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सकाळी सहा वाजता जनावरांना वैरण आणायला जातो,असे सांगून शेताकडे गेले.