पुणे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीच्या पिस्तुलासह फिरणाऱ्या आरोपीस पर्वती पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. १० सप्टेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार व तपास पथक पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ओंमकार दिपक जाधव (वय २२, रा. आंबेगाव पठार) यास पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, चार मॅगझिन