मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसीय उपोषणाला यश मिळाले असून राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयाच्या आनंदात शहरातील सिव्हिल लाईन चौकात मराठा समाजाने जल्लोष केला. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमला. जल्लोषमय वातावरणात मराठा समाजातील युवक-कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.