गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते आज दि 27 आगस्ट ला 11 वाजता वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते.