– गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शहरभरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासूनच घरगुती तसेच मंडळांच्या गणपतींच्या मूर्ती घेऊन नागरिक विसर्जन घाटांवर व कृत्रिम विसर्जन हौदांवर गर्दी करू लागले. नगरपालिकेने शहरभरात उभारलेल्या शेकडो कृत्रिम विसर्जन हौदांवर तुडुंब गर्दी दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया"च्या जल्लोषात भाविकांनी बाप्पाचे निरोप घेतले. यावेळी महिला व लहान मुलांची