देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आता ११ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आमदार राजेश बकाने यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. या संदर्भात आज २६ ऑगस्टvरात्री ८ वाजता प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.