हिंगोली : येथील दसरा महोत्सवा दरम्यान उभारल्या जाणार्या कृषि व औद्योगिक प्रदर्शनी व रामलिला मंच तयार करण्यासाठी निविदा कमी आल्यामुळे मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती तहसीलदार तथा दसरा महोत्सव समितीचे सचिव श्रीकांत भुजबळ यांनी दिली आहे पुढील महिन्यात होणार्या दसरा महोत्सवासाठी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीतर्फे विविध कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या अंतर्गत रामलिलेकरीता हनुमान, रावण, मेघनाग, शूर्पनखा, मारीच, जटायू आदींसहीत हत्ती – घोडे इत्यादी तयार करणे, रामलिला सादर करणे