चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या खिर्डी येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे मंगल आगमन आज दि 27 आगस्ट 10 वाजता मोठ्या भक्तिभावात व उत्साहात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सपत्नीक, सहकुटुंब पुजाअर्चा करून लाडक्या बाप्पाची मनोभावे आराधना केली. धोटे कुटुंबियांसह गावातील नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावून पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे स्वागत केले.