– पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या संशोधन संस्थेच्या आवारातून चंदनाची सात झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुरक्षारक्षकांनी दोन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून इतर दोन चोरटे पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एनसीएलच्या आवारात प्रवेश करून चंदनाची झाडे कापली. त्यावेळी गस्त घालत असलेल्या सुरक्षारक्षकांनी संशयितांना पकडले. प