वडनेर गेट येथून बिबट्याने श्रुतिक गंगाधर या दोन वर्षाच्या मुलाला ओढून नेल्याची घटना घडली होती. यानंतर आर्मीचे दोनशेहून अधिक जवान आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतीकचा शोध घेतला जात होता. अखेर या दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला आहे. श्रुतिक गंगाधर याला बिबट्याने घराच्या अंगणातून ओढून नेले होते.यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण आर्टिलरी सेंटरचे जंगल आर्मीचे जवान व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला.