गडहिंग्लज तालुक्यातील सामान गड किल्ला आणि तिलारी नगर या वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली आहे. त्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 18 जुलै सायंकाळी चार वाजता त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.