कोपरी परिसराच्या साईनाथ नगर येथे विकास सोसायटी चार या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये पहाटे अचानक आग लागली. अचानक आग लागल्याने इमारतीत दूर पसरल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर महावितरण कर्मचारी पोलीस कर्मचारी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु 30 मीटर बॉक्स जळून खाक झाल्याने इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.