मानकापूर उड्डाणपुलावर आज स्थानिक तरुणांनी रास्ता रोको आंदोलन केले. उड्डाणपुलावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज आंदोलन करत वाहतूक थांबवली आणि जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून मानकापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरू आहे.