साक्री-शेवाळी बायपास चौफुलीवर सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास नवापूरकडून येणाऱ्या टँकर (जीजे १२, बीएक्स २३७७) ने नंदुरबार-पालघर बस (एमएच १४, एलएक्स ९७४१) ला धडक दिली. या अपघातात बसमधील तीन ते चार प्रवासी जखमी झाले. जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे गतिरोधकावर बसचा वेग चालकाने कमी न करता व नवापूरकडून वेगात येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करत बसचालक इम्रान पठाण यांनी चौफुली ओलांडण्याचा प्रयत्न केला. कंटेनरचालकाने वाहन नियंत्रित करीत असता