मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकाकोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड सोबत चार करार करण्यात आले आहेत. मुंबई येथे पालघर, पुणे, रत्नागिरी, जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत हे चार करार करण्यात आले आहेत. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे आणि मान्यवर उपस्थित होते.