कापुसतळणी येथे आज सकाळी १२:०० वाजता श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरात आरोग्यासंबधी विविध तपासण्या केल्या जात असून तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान गणेश मंडळ कापूसतळणी यांच्याकडून करण्यात आले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून हनुमान गणेश मंडळाची स्थापना असलेल्या मंडळाच्या गणपतीला मानाचा गणपती म्हणून तालुक्यात ओळखल्या जाते.९८ वर्षापासून विविध लोकोपयोगी उपक्रमाने गणेशोत्सव साजरा होत असतो.