महसुल विभागाचा महत्वाचा कणा असलेल्या महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावे या मागणीला घेऊन भद्रावती तालुका महसुल सेवक संघटनेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.सदर धरणे आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप नागपूरे यांचेसह तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत.