धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने धडक मोहीम राबवून कठोर कारवाईचे आदेश दिले. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष कृती दल गठित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य केंद्रांत वेळेवर हजेरी, स्वच्छता राखणे, तसेच कर्करोग-क्षयरोग व कामगार विमा योजनांबाबत जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला.