नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे.