दारव्हा तालुक्यातील शेंद्री बु ते घनापूर वसंत हायस्कूलकडे जाणाऱ्या पाचशे मीटर अंतराच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन बहुजन मुक्ती पार्टीतर्फे अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दारव्हा यांना दि. ८ सप्टेंबरला दु. १ वा.देण्यात आले.