सावखेडा शिवारातील सुंदर मोती नगरात राहणाऱ्या विवाहितेने सासरच्या जांचाला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली होती. सासरच्यांनी मेडीकलसाठी १० लाखांची मागणी केल्याने मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा खळबळजनक आरोप माहेरच्यांनी केला होता. याप्रकरणी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीसात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.