लातूर -येथील जिल्हा परिषद परिसरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रंथ भेट देवून त्यांचे स्वागत केले.